भारती एअरटेल ही आपल्या देशातील एक नामांकित टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे ग्राहक जगभरामध्ये पसरलेले आहेत. सध्या एअरटेलद्वारे 4G, 4G+, 5G आणि 5G+ नेटवर्कच्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. ग्राहकांना 5G प्लस नेटवर्कची क्षमता अनुभवता यावी यासाठी एअरटेल कंपनीद्वारे नव्या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने 5G प्लस सेवांवरील कमाल मर्यादा काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्राहकांना डेटा संपल्यावरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

एअरटेल कंपनीद्वारे दिली जाणारी ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी रुपये २३९ पासूनच्या अनलिमिटेड रिचार्जवर उपलब्ध आहे. सर्व पोस्टपेड ग्राहक त्यांच्या प्लॅनची ​​पर्वा न करता ऑफरचा दावा करु शकतात. या कंपनीची सेवा घेणारे ग्राहक Airtel Thanks App वर लॉग इन करुन 5G प्लस नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतात. याव्यतिरिक्त https://www.airtel.in/airtel-thanks-app या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने देखील नव्या ऑफर लाभ घेता येऊ शकतो. आपल्या मोबाईलमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा कसा अ‍ॅक्टिव्ह करायचा ते जाणून घेऊयात.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

हेही वाचा : Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का, आता ९९ नाही तर..; ५७ टक्कयांनी महागला सर्वात स्वस्त प्लॅन

१.

एअरटेलचे अनलिमिटेड ५जी नेटवर्क सुरु करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या फोनमधील Google Play Store ,Apple App Store तसेच My Airtel अ‍ॅप किंवा Airtel Thanks अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

२.

अ‍ॅप ओपन केल्यावर तुमच्या एअरटेल नंबरचा वापर करून लॉग इन करावे.

३.

लॉग इन केल्यानंतर 5G प्लससाठी अनलिमिटेड 5G डेटाचा क्लेम Airtel लोगोसह समोरच्या स्क्रीनवर दिसेल. तिथे अ‍ॅरोवर क्लिक करून पुढे जावे.

४.

आता एअरटेलचा लोगो जाहिरातीसह अनलिमिटेड 5G Data Exclusive For You स्क्रीनवर दिसेल. त्याच्या खालीच claim now असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. तुम्ही हे केल्यावर तुमच्या Airtel नंबरवर Airtel 5G Plus Unlimited 5G डेटा सुरू करण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज येईल.

५.

एकदा तुमचा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करत असल्याची खात्री झाली की तुम्ही स्ट्रीमिंग, डाउनलोड आणि अपलोडिंगसाठी एअरटेलचा अनलिमिटेड ५ जी डेटा अपलोडींगसाठी मोफत मिळवू शकता.

हेही वाचा : Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! रिचार्ज प्लॅन महागणार, अध्यक्ष मित्तल म्हणाले “ही दरवाढ…”

अनलिमिटेड एअरटेल ५जी सेवा वापरण्यासाठी तुमच्या फोन सुद्धा ५जी असणे आवश्यक आहे. तुमचा स्मार्टफोन ५जी नेटवर्कची योग्य आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तपासात येणार आहे. यासाठी Airtel Thanks App याच्या मदतीने तुम्ही लिस्ट पाहू शकता आणि तपासू शकता. एअरटेल ५जी सेवा मर्यादित भागांमध्येच उपलब्ध आहे. सध्या एअरटेलने देशातील २६५ शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु केले आहे.