गेल्या काही वर्षात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राती बड्या देशांनी चंद्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. चीन, भारत, जपान यासारख्या देशांनी चंद्रावर यशस्वीरित्या लँडर उतरवले आहेत आणि त्या देशांच्या रोव्हरनी चंद्रावर मुक्त संचारही केला आहे. आता त्यात चंद्रावर विजय मिळवणाऱ्या अमेरिकेचीही भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजून ५३ मिनिटांनी अमेरिकेच्या Intuitive Machines या कंपनीचे Odysseus नावाचे लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. ज्याला IM-1 या नावानेही ओळखले जाते. Odysseus Lunar lander चे एकुण वजन १९०० किलो आहे. १५ फेब्रुवारीला या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले, २१ फेब्रुवारीला हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचले होते. IM-1 हे सहा पायांचे असून ४.३ मीटर उंचीचे षटकोनी आकाराचे आहे. याचा आकार एका छोट्या SUV एवढा आहे.

१९ डिसेंबर १९७२ ला अमेरिकेच्या अपोलो १७ मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेचे शेवटचे दोन अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. अपोलो मोहिमे अंतर्गत अमेरिकेचे एकुण १२ अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. तेव्हाच्या चांद्र स्पर्धेत सोव्हिएत रशियावर अमेरिकेने विजय मिळवला होता. यानंतर थेट चंद्राभोवती विविध यानं जरी अमेरिकेने पाठवली असली तरी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणारी कोणतीही मोहिम आखली नव्हती.

आता Artemis program मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर मुक्काम करण्याची मोहिम अमेरिकेच्या नासाने हाती घेतली आहे. २०२५ नंतर अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर पुन्हा उतरत काही दिवस मुक्कामही करणार आहेत. ही अर्थात अत्यंत खार्चिक मोहिम असणार आहे. या मोहिमेसाठी विविध कंपन्यांची मदत नासा घेत आहे, चांद्र मोहिमांकरता त्यांना अर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत आहे.

याचाच एक भाग म्हणून Intuitive Machines कंपनीचे यान चंद्रावर उतरले आहे. पुढील १४ दिवस ते कार्यरत असेल आणि चंद्रावरील विविध माहिती यानावरील संवेदकांद्वारे गोळा केली जाणार आहे. अमेरिकेतील भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी या कंपनीची मदत घेतली जाणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us origin intuitive machines companys odysseus lunar lander im 1 soft landed on south pole of moon asj