भारतामध्ये सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र व्हीआयला अजूनही आपले ५ जी नेटवर्क लॉन्च करता आलेले नाही. लवकरच ते होण्याची शक्यता आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय कोणता आहे ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने आपल्या एका सर्कलमधून ९९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. टेल्को कंपनीने हरियाणा सर्कलमधून आपला ९९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. व्हीआयने इतर सर्कलमध्ये ९९ रुपयांचा प्लॅन ऑफर करणे सुरू ठेवले असता कंपनीने मुंबई,गुजरात आणि दिल्लीमधील या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये बदल केला आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: Samsung च्या ‘या’ फोनमध्ये मिळणार दोन दिवसांचा जबरदस्त बॅटरी बॅकअप, एकाचवेळी घेता येणार ४ व्हिडीओ आणि…

मुंबई,गुजरात आणि दिल्लीमधील या प्लॅनची वैधता २८ दिवसांवरून कंपनीने १५ दिवस इतकी केली आहे. या सर्व निर्णयांमधून कंपनी त्याचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच यासाठी कंपनी वेगवेगळे निर्णय घेऊन काय परिणाम होतात याची चाचणी करत आहे.

९९ रुपयांच्या प्लॅनचे कंपनी पुढे काय करायचे हे ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर ठरवेल. हरियाणामध्ये ९९ रुपयांचा प्लॅन बंद केल्यामुळे तेथील नागरिकांकडे आता रिचार्ज साठी १०० रुपयांच्या आतील कोणताच प्लॅन उपलब्ध नसेल. भारती एअरटेलने देखील त्यांच्या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये हेच केले. हा प्लॅनच कंपनीने बंद करून टाकला. आता एअरटेलच्या ग्राहकांना सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज हा १५५ रुपयांचा आहे.

२०२३ या आर्थिक वर्षामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा ARPU १३५ रुपये राहिला. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे ARPU मध्ये व महसुलामध्ये किरकोळ वाढ होऊ शकते. मात्र यामुळे कंपनीला आणखी ग्राहक गमावण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

हेही वाचा : स्पर्धा करा, फसवणूक नाही: ट्विटरची मेटाला कोर्टात खेचायची धमकी

वोडाफोन-आयडियाचे सीईओ अक्षय मुंद्रा यांनी सांगितले, ते ५जी लॉन्च करण्यासाठी योजना आखत आहेत. मात्र त्यासाठी निधी आणि उपकरणांची ऑर्डर मिल्ने आवश्यक आहे. व्हीआयसाठी पुनरागमन करण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढवणे आणि महसूल सुधारणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea removes 99 rs plan in haryana cricle try to boost revenue check details tmb 01