डोंबिवली – येथील पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील एक कुटुंब सुट्टी घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील ३९ लाखांहून अधिक रकमेचा सोने, चांदी, रोख रकमेचा ऐवज चोरून नेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले, येथील पश्चिमेतील भाविक इमारतीत राहणारे श्रीनिवास गुरुपोली आपल्या कुटुंबासह उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे पाच दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची खात्री पटल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोने, चांदी असा एकूण ३९ लाखांहून अधिक रकमेचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. शनिवारी तीर्थयात्रेवरून परतल्यावर गुरुपोली कुटुंबीयांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – भिवंडी दुर्घटना; मृतांची संख्या सहा

मे महिन्यात अनेक कुटुंब गावी जातात. या कालावधीत चोरीचे प्रकार वाढताता. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 lakhs worth items stolen from from a dombivli family house ssb