अंबरनाथः नेहमी चहा पिण्यासाठी येणाऱ्या एका ग्राहकाला चहावाल्याने त्याची ११० रूपयाची उधारी असल्याचे सांगत ती देण्याची मागणी केल्याने, संतापलेल्या ग्राहकाने चहावाल्याच् डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षुल्लक कारणावरून मारहाणीचे प्रकार अंबरनाथ शहरात नवीन नाहीत. सोमवारी असाच एक प्रकार समोर आला. चहाची उधारी मागितल्याने एका व्यक्तीने चहावाल्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील पिंक सिंटीजवळ दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. जनार्दन उंदरू म्हारसे असे मारहाण झालेल्या  चहा विक्रेत्याचे नाव आहे.  ते मोतीराम पार्क येथे  वास्तव्यास आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास रामू नावाचा एक इसम नेहमीप्रमाणे चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी आला. यापूर्वीच्या चहाचे ११० रूपये चहावाल्याला देणे बाकी होती. त्याची आठवण करून देत जनार्दन म्हारसे यांनी ११०  रूपये उधारी दे असे रामू याला सांगितले.  मात्र  उधारी मागितल्याचा राग आल्याने रामू याने मला उधारी  मागतो काय, असा बोलत लाकडी दांडक्याने जनार्दन म्हारसे यांच्या डोक्यावर मारले.  या  प्रकारानंतर जनार्दन म्हारसे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रामू या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beating tea seller asking tea east customer ysh
First published on: 10-08-2022 at 10:36 IST