सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळेत पथदिवे चालू होत नसल्याने कल्याण-डोंबिवलीत नागरिकांचा अंधारातून प्रवास

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी, बोरमाळ चोरांकडून हिसकावून नेण्याचे प्रकार वाढल्याने महिला वर्ग पोलीस यंत्रणेवर सर्वाधिक संतप्त आहे.

darkness in kalyan dombivli
डोंबिवलीत फडके रस्त्यावरील पथदिवे सकाळी सहा वाजता बंद होत असल्याने नागरिकांना विजेऱ्यांच्या उजेडातून प्रवास करावा लागतो.

कल्याण– कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक रस्त्यांवरील पथदिवे चालू बंद करण्याची व्यवस्था प्रशासनाने स्वयंचलित पध्दतीने केली आहे. सूर्यादय, सूर्यास्ताच्या वेळा पाहून विद्युत विभागाचे अधिकारी पदपथ, रस्त्यांवरील स्वयंचलित पथदिवे चालू बंद करण्याची व्यवस्था करतात. अलीकडे सूर्योदय सकाळी सहा वाजून ३२ मिनिटे आणि सूर्यास्त सहा वाजून ४६ मिनिटांनी होतो. पदपथावरील दिवे सकाळी सहा वाजता बंद होतात आणि संध्याकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान अनेक ठिकाणचे दिवे लागतात. त्यामुळे नागरिकांना काही वेळ अंधारातून येजा करावी लागते.

कल्याण, डोंबिवलीत भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. शहरात पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली पोलीस यंत्रणा असुनही एवढा ढिसाळपणा पोलीस यंत्रणेत आला कोठून असे प्रश्न शहरातील नागरिक विशेषता महिला वर्गाकडून उपस्थित केले जात आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी, बोरमाळ चोरांकडून हिसकावून नेण्याचे प्रकार वाढल्याने महिला वर्ग पोलीस यंत्रणेवर सर्वाधिक संतप्त आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी अतिक्रमण उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक

सर्यादय सकाळी सहा वाजता होतो आणि संध्याकाळी साडे सहा वाजता सूर्यास्त होतो. उदय, अस्ताच्या नियोजनाप्रमाणे पालिका अधिकाऱ्यांनी रस्त्यांवरील पथदिवे स्वयंचलित पध्दतीने चालू-बंद होतील असे नियोजन केले आहे. जुन्या नियोजनाप्रमाणे आता सकाळी सहा वाजता रस्त्यांवरील दिवे बंद होतात आणि संध्याकाळी साडे सहा नंतर पथदिवे लागतात. अलीकडे सूर्यादय सकाळी ६.३२ वाजता आणि सूर्यास्त ६.४६ वाजता होतो. परंतु, रस्त्यावरील दिवे सकाळी सहा वाजता बंद होतात. पहाटे कामावर निघालेल्या नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यासायिक यांची कोंडी होते. त्यांना मोबाईल विजेऱ्या सुरू करुन रेल्वे स्थानकापर्यंत काळोखातून जावे लागते. सूर्यास्त होईपर्यंत हा प्रकार सुरू असतो. अनेक नागरिक सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्यांनाही विजेऱ्या घेऊन घराबाहेर पडावे लागते. संध्याकाळी पथदिवे अनेक वेळा सात किंवा सव्वा सात वाजता लागतात. तोपर्यंत नागरिकांना अंधारातून येजा करावी लागते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव धमकी प्रकरणी सात जणांना नोटीस

सूर्यादय, सुर्यास्ताच्या वेळा पाहून पालिकेने रस्त्यावरील पथदिवे चालू, बंद होतील याचे नियोजन करावे, अशी मागणी नोकरदार वर्गाकडून केली जात आहे.

“ शहराच्या ज्या भागात सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळेप्रमाणे पथदिव्यांचे दिवे लागणे होत नाही. त्या भागाची पाहणी करुन तेथे तसे नियोजन केले जाईल. सूर्योदय, सूर्यास्ताचे वेळापत्रक पाहून स्वयंचलित दिवे लागणाची वेळ निश्चित केल्या आहेत.”

प्रशांत भागवत- कार्यकारी अभियंता विद्युत विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:39 IST
Next Story
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी अतिक्रमण उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक
Exit mobile version