आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ठाणे येथील लुईसवाडी परिसरात एका कारच्या इंजिनमध्ये अचानकपणे आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेत कारचालक मात्र सुदैवाने बचावला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरच ही घटना घडल्यामुळे या मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.
कळवा परिसरात राहणारे चंदन नवनीत चतुर्वेदी यांची ही कार आहे. मंगळवारी रात्री ते कारने मुंबईहून घरी परतत होते. त्या वेळी कारमध्ये ते एकटेच होते. मुंबई-नाशिक महामार्गाने कळव्याच्या दिशेने कार घेऊन जात असतानाच नितीन कंपनी येथील लुईसवाडी भागात कारच्या इंजिनने अचानकपणे पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ते कारमधून बाहेर पडले. रस्त्याच्या मधोमधच कारला आग लागल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
First published on: 16-03-2016 at 00:25 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire take place in car at louis wadi thane