भिवंडीतील गुंदवली गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीला घरातून ओढत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बसू हरी जाधव असे या आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील गुदवली येथील खडी मशीनच्या परिसरात राहत होता. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी घरी एकटी असलेल्या तरुणीच्या घरी घुसून बसू याने तिला बाहेर काढले. तेथून तिला त्याच्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर या तरुणीने पोलिसात जाऊन तक्रार केली.