ठाण्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घरपोच किराणा साहित्य देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून http://essentials.thanecity.gov.in/ हे विशेष संकेतस्थळ डीजी ठाणे या प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले आहे. ग्राहकांपर्यंत पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी काही नोंदणीकृत दुकानांना ‘झोमॅटो’ या ऑनलाइन खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत जोडण्यात आले आहे.