ठाणे : कापूरबावडी येथील नळपाडा परिसरात उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून एका तरुणाला सिमेंटची वीट फेकून मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात प्रवीण जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – डोंबिवली : वर्षभरात अयोध्येत राम लल्लांची मूळ जागी प्रतिष्ठापना; स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची माहिती

हेही वाचा – समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र; औरंगजेबाचे उदात्तीकरण

कापूरबावडी भागात उमेश चव्हाण राहतात. सुमारे महिन्याभरापूर्वी त्यांनी मित्र प्रवीण जाधव यास वैयक्तिक कामासाठी ५०० रुपये उसने दिले होते. मंगळवारी उमेश हे परिसरातून जात असताना त्यांना प्रवीण भेटला. उमेश यांनी त्यांचे ५०० रुपये प्रवीण याच्याकडून परत मागितले. त्यानंतर प्रवीणने उमेश यांना १०० रुपये दिले. उर्वरित ४०० रुपयांची मागणी उमेशने केली असता, प्रवीणने उमेश यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर त्याने सिमेंटच्या वीट फेकून उमेश यांना मारून तिथून पळ काढला. उमेश यांच्या चेहऱ्यास मार लागल्याने रक्त येऊ लागले. याप्रकरणी उमेश यांनी बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात प्रवीण विरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane a youth was pelted with a cement brick ssb