बदलापूरः गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या काहिलीची मालिका गुरूवारीही सुरूच होती. मात्र ढगाळ वातावरणामुळे गुरूवारी दुपारच्या तापमानात बुधवारच्या तुलनेत किंचित घट दिसून आहे. जिल्ह्यातील सरासरी तापमान गुरूवारी ३९ अंश सेल्सियसपर्यंत होते. तर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४१ अंश सेल्सियस मुरबाड तालुक्यात नोंदवले गेले. तर जिल्ह्यात ठाण्यात ३८.८ अंश सेल्सियस हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या शहरांमध्ये तापमानात मोठी उसळी गेल्या काही दिवसात पाहायला मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तापमान बुधवारपर्यंत ४० अंश सेल्सियसच्या वर गेले होते. बुधवारी जिल्ह्यात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. गुरूवारीही तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. वरच्या पातळीचे वार्यामधे द्रोणीय रेषेमुळे अरबी समुद्रवरुन बाष्प येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्यामुळे तापमानात किंचीत घट नोंदवली गेली. गुरूवारी जिल्ह्यातील सरासरी तापमान ३९ अंश सेल्सियस होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सियसची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली. मात्र जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये गुरूवारी पारा चाळीशीच्या आतच होता. त्यामुळे तापमानात काही अंशी दिलासा मिळाला. गुरूवारीही उन्हाच्या झळा लागतच होत्या. ढगाळ वातावरणामुळे होणारी काहिली काही अंशी कमी होती. दुपारनंतर तापमानात घट पाहायला मिळाली.
हेही वाचा… अर्थशास्त्राचा पेपर देऊन नववधू थेट विवाह मंडपात, कल्याण जवळील जीवनदीप महाविद्यालयातील घटना
शहर तापमान
ठाणे ३८.८ अंश सेल्सियस
नवी मुंबई ३८.४
मुंब्रा ३९.१
डोंबिवली ३९.५
कल्याण ३९.६
बदलापूर ३९.५
मुरबाड ४१
कर्जत ४३