गडकरी रंगायतनमध्ये १५ जानेवारीला सोहळा
ठाणे : शहरातील सांस्कृतिक वर्तुळात मानाचा समजला जाणारा ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव २०२१’ यंदा १५ जानेवारी रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. संगीत कार्यक्रमाच्या मेजवानीसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या सोहळ्यात ‘युवोन्मेष पुरस्कार’, ‘ठाणे मार्नंबदू पुरस्कार’ तसेच ‘इंद्रधनु सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार’ प्रदान सोहळाही संपन्न होणार आहे.
ठाण्यातील इंद्रधनु संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम तसेच कार्यक्रम राबविले जातात. शहरातील सामाजिक तसेच सांस्कृतिक वर्तुळात अनेक दर्जेदार आणि ठाणेकर चोखंदळ रसिकांच्या विशेष पसंतीस उतरतील असे अनेक सोहळे या संस्थेने आयोजित केले आहेत. दरवर्षी होणारा इंद्रधनु रंगोत्सव सोहळा हा ठाणेकर नागरिकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्र्रंबदू राहिला आहे. गेल्या काही वर्षापासून ‘लोकसत्ता’च्या सहभागाने आयोजित होणाऱ्या या सोहळ्याची ठाणेकर रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या वर्षी हा सोहळा शनिवार, १५ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५.३० वाजल्यापासून रंगणार आहे. हा सोहळा लोकसत्ताच्या सहकार्याने होत आहे. यंदाचा रंगोत्सव दोन सत्रात पार पडणार आहे.
पहिल्या सत्रात कवयित्री शांता शेळके आणि कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या अजरामर साहित्यकृतींचे अभिवाचन आणि त्यांच्या सुमधुर गीतांचा नजराणा ‘असेन मी, नसेन मी’ या विशेष कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. गिरीश ओक, स्पृहा जोशी, अमेय ठाकूरदेसाई, अमोघ दांडेकर, झंकार कानडे आणि पाश्र्वगायिका सावनी रवींद्र यांचा समावेश असणार आहे. अनेकांना नेहमीच सिनेमात किंवा महालात दिसणाऱ्या ग्रँड पियानोचे अप्रूप वाटत आले आहे. या ग्रँड पियानोला बघण्याची आणि त्याचे कर्णमधुर स्वर प्रत्यक्ष ऐकण्याची संधी रसिकांना रंगोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात होणाऱ्या ‘मेलोडिज ऑफ ग्रँड पियानो’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मिळणार आहे. मंदार पारखी यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमात गायक जयदीप बगवाडकर, सोनाली कर्णिक, अमेय ठाकूरदेसाई, अमोघ दांडेकर, दत्ता तावडे, किशोर नारखेडे, विजू तांबे हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. हा रंगोत्सव रसिकांसाठी संगीत, साहित्याची मेजवानी ठरणार आहे. करोना नियमांचे पालन करून हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्णोत्सव देणगी प्रवेशिका गडकरी रंगायतन आणि ६६६. ३्रू‘ी३‘ँ्रंि‘ीी.ूङ्मे येथे ७ जानेवारीपासून उपलब्ध असणार आहेत.
युवोन्मेष पुरस्कार
‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सवा’त पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तरुणांना युवोन्मेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या ठाणेकर व्यक्तीला ठाणे मार्नंबदू पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यासह, इंद्रधनु सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार सोहळादेखील यावेळी होणार आहे.