दूषित पाण्यांमुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेने स्वत:ची जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कल्याण: पूर्व भागातील रस्त्यावरील स्वागत कमानींचा होतोय वाहतुकीला अडथळा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दरवर्षी विविध प्रकारचे आजार पसरत असतात. काही भागात दूषित पाणी घरात आल्याने ते पिऊन अनेक जण आजारी पडतात. बहुतांशी आजार साठवण केलेले, दूषित पाण्यामुळे होतात. या पाण्याची शुध्दता वेळीच तपासली तर त्यावर योग्य निर्णय घेऊन पुढील उपाययोजना पालिकेला करता येतात. दूषित पाणी आढळले की त्याचा नुमना घेऊन जल तपासणीसाठी कोकण भवन येथे चाचणीसाठी पाठवावा लागतो. त्यानंतर तेथून आठवड्याने पाण्याचा अहवाल आल्यानंतर पालिका प्रशासन पुढील कार्यवाही करते. हा विलंब टाळण्यासाठी दूषित पाण्याची गुणवत्ता तात्काळ होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने स्वताची जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे शहर अभियंता अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा- कल्याण: फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिका दाखल करणार फौजदारी गुन्हे

कल्याण डोंबिवली पालिकेची लोकसंख्या सुमारे १५ लाखाहून अधिक आहे. सुमारे दीड लाख अधिकृत आणि तेवढ्याच अनधिकृत इमारती, चाळी शहरात आहेत. या इमारतींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरुन पाणी पुरवठा केला जातो. अनेक वेळा पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या फुटून त्यात गटार, मल वाहिनीतील पाणी शिरते. हे पाणी घरा घरात जाऊन आजार वाढतात. पाणी दूषित असल्याची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेत प्रयोगशाळा असेल तर तात्काळ दूषित पाणी तपासणे शक्य होणार आहे.

हेही वाचा- डोंबिवली पश्चिमेत गावदेवीमध्ये मैदान, बगिचा आरक्षणावर बेकायदा इमारती ; वास्तुविशारद संदीप पाटील यांची ‘एसआयटी’, ‘ईडी’कडे तक्रार

पाण्याची गुणवत्ता राखून नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पालिकेसमोर शुध्द पाणी पुरवठ्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. अशावेळी ज्या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तेथील पाण्याचे नमुने घेऊन त्या पाण्याची गुणवत्ता तपासून योग्य कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. पालिकेकडून शुध्द पाण्याचा पुरवठा शहराला केला जातो. पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण, साथ पसरविणाऱ्या विषाणूंची माहिती तात्काळ मिळणे आवश्यक असल्याने पालिकेतील जल तपासणी प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यात सुसज्ज प्रयोगशाळा उभारली जाईल, असे अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा- बदलापूरः म्हसा यात्रेत जनावरांचा बाजार भरणार,महसूल व पशुसंवर्धन मंत्र्यांचा हिरवा कंदील; शेतकऱ्यांमध्ये समाधान

पालिका हद्दीत अनेक नाले आहेत. अनेक वेळा या नाल्यांमधून रसायन मिश्रित पाणी काही घटकांकडून सोडले जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी नाल्यातील पाण्याचा नमुना घेऊन कोणत्या रासायनिक घटनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हे शोधणे शक्य होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality will set up its own water testing laboratory dpj