कल्याण – डोंबिवलीतील कोपर गावमध्ये एका महिलेकडे पैशाची मागणी करूनही ती पैसे देत नसल्याने संतप्त झालेल्या कोपरमधील एका तरुणाने या महिलेच्या घरात जाऊन तिचा गळा तारेने आवळून तिचा बारा वर्षांपूर्वी खून केला होता. या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर. पी. पांडे यांनी एकाच गुन्ह्यात दोन १० वर्षांच्या आजन्म कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड रक्कम आरोपीने न्यायालयात भरणा केली नाही तर त्याला सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. योगेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव संतोष श्रीधर नांबियार (३२, रा. कारवार, जिल्हा- उत्तम कन्नड, कर्नाटक) आहे.

हेही वाचा – पैशांचा तगादा लावल्याने ज्येष्ठाची हत्या; बदलापुरातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा

सरकारी वकील ॲड. योगेंद्र पाटील यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. ॲड. पाटील यांनी सांगितले, आरोपी संतोष नांबियार हा डोंबिवलीतील कोपर गाव हद्दीत राहत होता. याच भागात रिद्धी सिद्धी काॅम्पलेक्समध्ये राहत असलेल्या गिता वल्लभ पोकळे (४५) यांच्याकडे आरोपी संतोष आपणास पैशाची खूप गरज आहे असे सांगून पैशाची मागणी करत होता. आपल्या जवळ पैसे नाहीत. त्यामुळे पैस देऊ शकत नसल्याचे उत्तर गिता यांनी संतोषला दिले होते. गिता पैसे देत नसल्याचा राग आल्याने मार्च २०११ मध्ये संतोषने गिता यांच्या घरात जाऊन त्या घरात झोपल्या असताना त्यांचा तारेने गळा आवळून खून केला होता. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कपाटातील सोन्याचा ऐवज असा एकूण एक लाख ५४ हजारांचा ऐवज घेऊन पलायन केले होते. या खून प्रकरणामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली होती.

हेही वाचा – मुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील चार ते पाच दिवस तापदायक

या खून प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोनवणे, पोलीस निरीक्षक आर. एल. कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांना पोलीस निरीक्षक खंदारे, खंदारे यांनी मार्गदर्शन केले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment for the accused who murder a woman in dombivli kopar ssb