दररोज आपल्या कामाची ठिकाणी कधी वेळेत तर कधी उशिरा घेऊन जाणाऱ्या नेहमीच्या लोकलची डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी झेंडुंच्या फुलांच्या माळा, लोकलमध्ये आरती, भजने गाऊन प्रवाशांनी पूजा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा

दुसऱ्यानिमित्त बुधवारी कार्यालयांना सुट्टी असल्याने लोकल प्रवास होणार नसल्याने प्रवाशांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी लोकलची अन्नदाती या भावाने पूजा केली. प्रत्येक डब्यातील प्रवासी लोकलच्या खिडक्या, दरवाजे यांना फूलमाळा लावण्यात दंग होते. डब्यामध्ये चारही बाजुने झेंडुच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

लोकलच्या मोटारमनची गंध, अक्षता लावून अन्नदातेचा चालक म्हणून पूजा करण्यात आली. लोकलच्या दोन्ही बाजुच्या दर्शनी भागात फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. आपण आपल्या घरात पूजा करतोय अशा भावनेतून प्रवासी लोकल सजविण्याच्या कामात सकाळी व्यग्र होते.
लोकल सजावट झाल्यानंतर लोकल समोर, डब्यात नारळ वाढवून, पेढे वाटून दसऱ्याचा आनंद साजरा करण्यात आला. महिला डब्यातही महिला उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. लोकल सुरू होताच देवीच्या आरत्यांना वाजत गाजत सुरूवात करण्यात आली. सीएसएमटी येईपर्यंत प्रवासी देवीचा जागर करत, भजने करत प्रवास करत होते.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train pujan by passengers at dombivali and kalyan railway station on the occasion of dasara dpj
First published on: 04-10-2022 at 12:23 IST