‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनाच्या निमित्ताने ठाण्यात पाककृती स्पर्धा; अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, अभिजित खांडकेकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी, ठाणे</strong>
किनाऱ्यावरील राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत नक्की काय दडलंय हे सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या अंकाचे प्रकाशन येत्या गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी ठाण्यात होत आहे. यानिमित्ताने खास पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’ अंकात नऊ राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थांचा परिचय करून दिला आहे. अशी खाद्यसंपन्न माहिती आणि पाककृतींनी नटलेल्या ‘पूर्णब्रह्म’चे येत्या गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे प्रकाशन होणार आहे. त्या निमित्ताने विशेष पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नारळाचा कोणताही एक गोड पदार्थ घरी बनवून आणून सादर करायचा आहे. अशा रितीने आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आणि जिंकू शकता आकर्षक बक्षिसे. केवळ महिलाच नव्हे तर आताशा स्वयंपाकघरात सहज वावरणाऱ्या पुरुषांनाही पाककला यानिमित्ताने सर्वासमोर दाखवण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी गुरुवारी २२ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत करता येणार आहे, तर मंगळवार आणि बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ०२२-६७४४०३४७/३६९ या क्रमांकावर नावे नोंदवता येतील.
पूर्णब्रह्म प्रकाशन सोहळा
’ कुठे – हॉटेल टिप टॉप प्लाझा, ठाणे
’ कधी – २२ ऑगस्ट , सायं. ६.
प्रायोजक
मुख्य प्रायोजक तन्वी हर्बल, सह प्रायोजक श्री धूतपापेश्व्र, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार, हेल्थ केअर पार्टनर होरायझन हॉस्पिटल.