कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या किनारी शनिवारी असंख्य कासव मृतावस्थेत आढळून आले. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याआधीही काही कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र शनिवारी मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पश्चिमेला असलेल्या भव्य गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. मात्र शनिवारी मात्र तलावाच्या किनारी असंख्य कासव मृतावस्थेत पडलेले दिसून आले. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी या घटनेची माहीती गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerous turtles die in gauripada lake of kalyan abn
First published on: 22-01-2022 at 20:21 IST