Passengers travel dangerously through on drain in Kopar East in Dombivli | Loksatta

डोंबिवलीतील कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास

कोपर पूर्व भागात एक नाला आहे. या नाल्यावर रस्ता नसल्याने नागरिकांनी या नाल्यावर रेल्वेचे सिमेंटचे स्लीपर टाकून त्यावरुन येजा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे.

डोंबिवलीतील कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास
कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास

डोंबिवली जवळील कोपर पूर्व रेल्वे स्थानका जवळील बेकायदा चाळींच्या भागात जाण्यासाठी एक नाला लागतो. या नाल्यावर रस्ता नसल्याने या भागातील रहिवाशांनी नाल्यावर रेल्वेचे स्लीपर टाकून त्यावरुन येजा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या पुलावरुन येजा करताना प्रवाशांची विशेषता शाळकरी मुलांची फरफट होत आहे.

हेही वाचा- ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

कोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा पालिकेच्या अखत्यारित असला तरी या भागात गेल्या १५ वर्षात पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी माफियांनी बांधल्या आहेत. या भागात पालिकेचे प्रस्तावित रस्ते नाहीत. माफियांनी चाळी बांधताना ठेवलेल्या मोकळ्या जागा हेच या भागातील रहिवाशांचे रस्ते आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना डोंबिवली, कोपर भागातून आपल्या भागात येताना पाऊस असेल तर चिखल, ओसंडून वाहणारा नाला याला तोंड देत मग घर गाठावे लागते.

हेही वाचा- डोंबिवलीत ‘लोकसत्ता ९९९’ उपक्रम उत्साहात ; देवीचा जागर, कोळी गीतांवर उपस्थित थिरकले; अभिनेत्री आदिती सारंगधर हिची उपस्थिती

कोपर पूर्व भागात एक नाला आहे. या नाल्यावर रस्ता नसल्याने नागरिकांनी या नाल्यावर रेल्वेचे सिमेंटचे स्लीपर टाकून त्यावरुन येजा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या स्लीपरचे लोखंडी हुक वरच्या बाजुला असल्याने या नाल्यावर दुचाकी जात असेल तर त्या हुकांना अडथळा येऊन अनेक वेळा दुचाकी स्वार दुचाकीसह नाल्यात किंवा रस्त्यावर पडतो, असे स्थानिकांनी सांगितले. या भागातील अनेक शाळकरी मुले डोंबिवली शहरात शाळेत जातात. त्यांची या पुलावरुन येजा करताना त्रेधातिरपीट उडते. रात्रीच्या वेळेत या भागातून जाताना अनेक वेळा पथदिवे नसतात. त्यामुळे अंधारात चाचपडत घर गाठावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली”; शिवसेनेच्या टीकेला नरेश म्हस्केंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

पालिकेने या भागात चांगला रस्ता आणि नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या भागात रस्ते कामे प्रस्तावित नाहीत. हा सगळा सागरी किनारा क्षेत्र, खारफुटी संवर्धन क्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे या भागात सुविधा देता येणार नाही असे सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

संबंधित बातम्या

डोंबिवलीत पलावामध्ये घर मालकाकडून भाडेकरूला धमकी; घरातील सामान फेकले
डोंबिवलीतील १५ बेकायदा इमारतींची ‘रेरा’ नोंदणी ‘महारेरा’कडून रद्द; करोना काळात बँकाँकडून माफियांना सर्वाधिक कर्ज
बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवलीत तरुणांच्या दोन गटात हाणामारी
ठाणे: कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक
दिवाळीमध्ये फक्त टिकल्या आणि लवंगीच वाजवा; ठाणे पोलिसांचे आदेश

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला विमाननगर भागात पकडले
Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन
‘पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर आता रुपेरी पडद्यावर; आनंद व्यक्त करत सायली संजीव म्हणाली…
“गरजेपेक्षा जास्त क्रिकेट…” संघांच्या व्यस्त वेळापत्रकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने व्यक्त केला संताप
मुंबई: रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ; मध्य-पश्चिम मुंबई उपनगरीय हद्दीत सर्वाधिक घटना