ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या एका जागेसाठीच्या लढाईत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रविंद्र फाटक यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून नाव जाहीर करण्यात आले. फाटक हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2016 रोजी प्रकाशित
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे डावखरेंना आव्हान, रविंद्र फाटक यांना उमेदवारी
राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध सेना-भाजप युतीचे रविंद्र फाटक
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 17-05-2016 at 09:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra pathak from shiv sena for vidhan parishad election