‘आगीशी खेळणे’ हा वाक्प्रचार मराठीत कसा व कधी रूढ झाला आहे हे समजण्यास मार्ग नाही. परंतु या वाक्प्रचारामुळे आपण आगीला किती घाबरतो हे समजून येते. इथे विरोधाभास असा आहे की, मानवाने लावलेला पहिला वैज्ञानिक शोध हा अग्नीचा आहे, असे समजले जाते. मानवाने अग्नीचा शोध लावला याचा
या आगीच्या शोधाचा फायदा मानवाने प्राचीन काळात अन्न शिजवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी केला. परंतु उत्क्रांतीच्या काळात बदलत्या जीवन समाजरचनेमुळे आणि जीवनशैलीमुळे आगीचे विविध उपयोग माणूस शिकला. अति उष्णतेत धातू वितळून त्याला आकार देऊन त्याचा उपयोग मुख्यत: शस्त्रास्त्रे, पुतळे, वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू बनविता येऊ लागल्या. औद्योगिक क्षेत्रात उष्णता हा उत्पादन निर्मितीतील महत्त्वाचा घटक बनला. म्हणजेच प्रत्यक्षात आगीचा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने करून आगीशी खेळ चालूच ठेवला आहे. मात्र, आगीशी अगदी जवळून खेळणाऱ्यांमध्ये ठाण्याच्या डॉ. कुलभूषण जोशी याचे नाव घ्यावेच लागेल.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे ठाण्यातील कामकाज सांभाळणारे रश्मी आणि अरिवद जोशी या दाम्पत्याचा कुलभूषण हा मुलगा. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या कुलभूषणने २००६मध्ये मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयरची पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थ-ईस्टर्न विद्यापीठात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत त्याने एम. एस. ही पदवी मिळवली. हे शिक्षण सुरू असतानाच त्याने ‘कोळसा आणि बायोमास’ म्हणजे उसाचा चोथा यांच्या एकत्रित ज्वलनशीलतेच्या अभ्यासावर एक प्रबंध लिहिला होता. याच विषयावर अधिक सखोल संशोधन करण्याच्या हेतूने त्याने पीएच.डी.साठी वॉर्सेस्टर एमए येथील वॉर्सेस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूटच्या अग्निरक्षक अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला आणि प्राध्यापक अली रंगवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संशोधन सुरू केले.
कुलभूषणचे कौतुक केवळ त्याने कमी वेळात पीएच.डी. पूर्ण केली म्हणून आहेच आणि या तरुण वयात त्याचे त्याच्या संशोधना संदर्भात आठ पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या विविध पेपरांत त्याने कारखान्यातील निर्मिती क्षेत्रातील उष्णता नियोजनाबरोबर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषण नियंत्रण या संदर्भात केलेले संशोधन मांडले आहेत. कुलभूषणचे सध्याचे कार्यक्षेत्र कोळसा, विविध ज्वलनशील वायू आणि इंधन यांचा निर्मिती क्षेत्रात वापर करतानाचे कारखान्याचे नियोजन आणि आराखडा तयार करणे आहे. विशेषत: कमी नायट्रोजन ऑक्साईड हवेत सोडतील अशा प्रकारचे बर्नर डिझाईन करणे. शेवटी आगीशी खेळू नकोस हा मराठमोळा सल्ला धुडकावून एक मराठी ठाणेकर तरुण खरोखरच प्रत्यक्ष आगीशी खेळून जागतिक पातळीवर ठाणे शहराचे नाव मोठे करीत आहे ही आपल्या सर्वानाच अभिमानाची गोष्ट आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2015 रोजी प्रकाशित
आगीशी खेळणारा तंत्रज्ञ
‘आगीशी खेळणे’ हा वाक्प्रचार मराठीत कसा व कधी रूढ झाला आहे हे समजण्यास मार्ग नाही. परंतु या वाक्प्रचारामुळे आपण आगीला किती घाबरतो हे समजून येते.

First published on: 14-05-2015 at 12:40 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science technision who plays with fire