ठाण्यातील घोडबंदर रस्ता येथील आनंदनगर बस थांब्याजवळ तन्मय वेतकर (१८) या युवकाने नॅनो कारने अप्पुस्वामी चामी (६१) यांस धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी युवकावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आले नाही.
तन्मय वेतकर या युवकाने (एम. एच. ०१ बीबी ५२४९) नॅनो कारने रविवारी दुपारच्या सुमारास अप्पुस्वामी चामी यांस जोरदार धडक दिली. या वेळी जास्त जखमी झाल्याने चामी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तन्मय वेतकर या युवकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.