ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवारी (१८ जून) सकाळी ९ ते गुरूवारी (१९ जून) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली, ओवळा या भागातील पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील.
तसेच, समता नगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, कारागृह परिसर, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा शहरातील काही भागात बुधवारी रात्री ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे असे महापालिकेने स्पष्ट केले.