मुंब्य्रात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद
ठाणे : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे, भिवंडी आणि मुंब्रा शहरात आंदोलने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान भिवंडी येथील जकातनाका भागात काही कामगार संघटनांनी ‘रास्ता रोको’ केल्याने या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच मुंब्रा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे, भिवंडी आणि मुंब्रा शहरात आंदोलने करण्यात आली होती. भिवंडीत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनीयन (सिटू) संघटनेशी संलग्न असलेल्या लालबावटा पावरलुम वर्कर व असंघटित कामगार संघटना, सावित्रीबाई फुले विडी कामगार युनियन, जनहित क्रांती जनरल कामगार युनियन या संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भिवंडीतील जकात नाका येथे आंदोलन केले. या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात कामगार सहभागी झाले होते. आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ केल्याने या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका भिवंडीतील नागरिकांना सहन करावा लागला. भिवंडी शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांना सोडून दिले. या आंदोलनात कारखाने आणि गोदामातील कामगार सहभागी झाल्याने काही गोदामे आणि कारखाने बंद होती, असा दावा लालबावटा पावरलुम वर्कर आणि असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केला, तर मुंब्रा शहरातही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बंद पाळण्यात आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. जुनी निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता आणि इतर भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावे या मागण्यांसाठी बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप लोकलच्या धडकेत तरुणी ठार