Thane News : ठाणे : गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. यातील काही श्वानांकडून लहान मुलांवर तसेच नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. श्वानाच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अशा श्वानांचे नियंत्रण आणि नागरिकांचे संरक्षण यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही सातत्याने होत होती. आता महापालिकेच्या नव्या उपक्रमामुळे हा धोका कमी होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येतही मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. त्यातील काही भटक्या श्वानांकडून लहान मुले तसेच माणसांवर हल्ले करण्याचे प्रकारे वाढीस लागले आहेत.

अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत असले तरी त्यास प्राणिप्रेमींकडून मात्र विरोध होताना दिसतो अनेक ठिकाणी प्राणी प्रेम हे रस्तेवर शहरांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात त्यासही नागरिकांकडून कडाडून विरोध होताना दिसतो यावरून नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे असे असले तरी भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रेबीज पल्स लसीकरण मोहीम

ठाणे महापालिका हद्दीत रेबीज पल्स लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या रेबीज मुक्त भारत ( Rabies Free India) धोरणांतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीत रेबीज मुक्त भारत ही मोहीम २०२४ पासून राबविली जात आहे. रेबीज पल्स मोहिमेसह दैनंदिन लसीकरण मोहीम १४ नोव्हेंबर पासून महापालिका हद्दीत सुरू करण्यात आली आहे. ठाणे शहराला २०३० पर्यंत रेबीज नियंत्रणित क्षेत्र म्हणून घोषित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी म्हटले आहे.

भटके श्वान लसीकृत

ठाणे महानगरपालिकेने २०२४ आणि २०२५ या वर्षातील जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात पल्स लसीकरण मोहिम राबविली. यात जानेवारी २०२४ मध्ये ७४०९ भटके श्वान लसीकृत करण्यात आले. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ११५८२ भटके श्वान लसीकृत करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

श्वनाच्या गळ्यात पट्टे

या मोहिमेत भटके श्वान आणि मांजरांचे अँटी-रेबीज लसीकरण करण्यात येत असून यात लसीकरण झालेल्या श्वानांच्या गळ्यात रेडीयम रिफलेक्टर कॉलर पट्टा घालण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राणी मित्र संस्थेचे स्वयंसेवक व स्थानिक स्वयंसेवी संस्थांची (NGOs) मदत घेण्यास व सहभागी करुन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
.