Premium

बदलापूर : …अन् महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आजीबाईंची स्वाक्षरी; ‘गुलाबी ब्रिगेड’ अशी बिरुदावली देखील दिली

मुरबाडच्या आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर

Amitabh Baccahn and Gulabi briged

वयाच्या साठीनंतर किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून शाळेची पायरी चढणाऱ्या मुरबाड तालुक्यातील आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थीनींना नुकतेच बॉलिवुडच्या महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. ज्ञान मिळवण्याचा निश्चय साठीनंतर पूर्ण करणाऱ्या या आजीबाईंची स्वाक्षरी अमिताभ बच्चन यांनी आपल्या डायरीत घेतली. गुलाबी ब्रिगेड अशी बिरुदावली बच्चन यांनी यावेळी या आजीबाईंना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उतरत्या वयात किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून मुरबाडच्या फांगणे गावात काही वर्षांपूर्वी ‘आजीबाईंची शाळा’ सुरू झाली होती. अंबरनाथच्या मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षक योगेंद्र बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फांगणे आणि आसपासच्या गावातील आजीबाईंना यात शिकवण्यास सुरूवात केली. साठीनंतर शाळेची पायरी चढणाऱ्या या आजीबाईंनी गेल्या काही वर्षात अक्षरे गिरवत या शाळेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख तयार केली. आयुष्याच्या ज्या वयात माणूस नव्या गोष्टीची आशा सोडतो त्या वयात शिक्षणाला सुरूवात करणाऱ्या या आजीबाईंनी नुकतेच बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The senior students of ajibais school in murbad taluka participated in kaun banega crorepati program msr

First published on: 18-08-2022 at 14:05 IST
Next Story
शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार वीज थकबाकीदार ; केवळ १ हजार ७०० वीज थकबाकीदारांनी भरली थकीत रक्कम