भिवंडी येथील दापोडे भागात रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून दोनजण जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एकाच्या पायावरून ट्रक गेल्याने पायाचा अस्थिभंग झाला. तर दुसरा जखमी झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

हेही वाचा – ठाणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

भिवंडी येथील कोंबडपाडा भागात राहणारे सचिन जाधव हे शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीने मित्र रवि गोडसे याच्यासोबत दापोडे येथून जात होते. ते दुचाकीने दापोडे परिसरात आले असता, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या एक ट्रकचे चाक सचिन यांच्या पायावरून गेल्याने ते या घटनेत जखमी झाले. तर रवि यांच्याही कमरेला, पायाला मार लागला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकारामुळे भिवंडी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people were injured in an accident due to a two wheeler falling into a ditch pothole in thane ssb