व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईचा उत्सव! रविवारी असलेल्या या उत्सवानिमित्त गेल्या आठवडाभरापासूनच महाविद्यालयांचे कट्टे, बाजार ‘व्हॅलेंटाइन’मय झाले आहेत. बाजारात तर विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्र, रंगबेरंगी टेडी खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे. महाविद्यालयांमध्ये तर आतापासूनच व्हॅलेंटाइन डेची तयारी सुरू आहे. आता हा सण केवळ प्रियकर-प्रेयसीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यापलिकडे जात आपापल्या सहृदांना आठवणीने भेटण्याच्या, त्यांना आवडीची वस्तू भेट देण्याचा प्रघात रूजला आहे. प्रेमदिनाचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे..
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2016 रोजी प्रकाशित
इन फोकस : प्रेमदिनाचा उत्साह
बाजारात तर विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्र, रंगबेरंगी टेडी खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे.

First published on: 10-02-2016 at 07:40 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day enthusiasm