ठाणे : महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या योजनेतील पाणी पुरवठा जलवाहिनीच्या दुरस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार असून यामुळे शुक्रवारी आठ तासांकरिता कळवा, मुंब्रा, दिवा, कोलशेत आणि वागळे इस्टेटच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ८ या वेळेत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामध्ये दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समितीमधील किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग आणि घोडबंदरमधील कोलशेत व वागळे इस्टेटमधील काही परिसराचा समावेश असून या भागांचा आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply shut off eight hours some parts thane friday ysh