नोटांबदीच्या निर्णयाचे समर्थन करत कर्नाटकमधल्या एका ७ वर्षांच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहले आहे. ‘मोदींचा निर्णय योग्य असून देशातील काळा पैसा हटवण्यासाठी मोदींनी चालवलेल्या या अभियानाचे मी समर्थन करते’ असे या चिमुकलीने आपल्या पत्रात लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Viral Video : ‘बेवफा सोनम’वरून नरेंद्र मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. देशातील काळ्या पैशाला आणि बनावट नोटांना चाप बसावी यासाठी आपण हा निर्णय जाहिर करत असल्याचे मोदींनी सांगितले. मोदींच्या या निर्णयाला समर्थन मिळाले असले तरी याच मुद्द्यावरून विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत. नोटाबंदाच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा विरोधांनी पुढे केला. मात्र असे असताना कर्नाटकमधल्या ७ वर्षांच्या श्रेयाने मात्र मोदींच्या या निर्णयाला समर्थन देत त्यांना आपल्या हाताने एक पत्र लिहिले आहे. ‘पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून मी त्यांना साथ देते’ असे तिने या पत्रात लिहले आहे. आपण मोदींची खूप मोठी चाहती असल्याचे तिने ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला सांगितले. ‘मला आपला देश स्वच्छ हवा आहे, मोदींच्या या निर्णयामुळे गरीब जनतेचे कल्याण होणार आहे. म्हणूनच, मी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देते’ असे तिने सांगितले आहे. श्रेयाने मोदींसाठी एक फ्रेमही बनवली आहे. ज्यात तिने चलनातून बाद झालेल्या नोटा लावल्या आहे. मोदींना भेटून त्यांना हे पत्र तिला भेट द्यायचे आहे. त्यामुळे या चिमुकलीच्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

दोन दिवसांपूर्वी केरळच्या ७० वर्षीय वृद्धाने मात्र नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध करत आपले मुंडन केले होते. केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यात राहणा-या वाहिया या चहाविक्रेत्याने नोटाबंदीच्या विरोधात अर्धमुंडन केले होते. चहा विक्रीतून त्यांनी २३ हजार जमवले होते. ही त्यांची आयुष्यभराची पुंजी होती. मात्र सहकारी बँकेतील सर्व व्यवहार थांबवण्यात आल्याने त्यांना हे पैसे बदलता आले नाही. ते इतर बँकेत तासन् तास रांगेत उभे राहिले पण कमी रक्तदाबामुळे ते घेरी येऊन पडले. त्यांना रुग्णालयात ही भरती करण्यात आले. या निर्णयामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आपली सारी जमापुंजी जाळून टाकली आणि जोपर्यंत मोदी ‘पंतप्रधान’ या पदावर कायम राहतील तोपर्यंत आपण डोक्यावरचे केस कधीच वाढवणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old girl write letter to pm narendra modi supporting demonetisation