Optical Illusion: चित्रात लपलेले शब्द वाचण्यात ९९% लोकं ठरले अपयशी; तुम्ही शोधू शकता का?

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Optical Illusion: चित्रात लपलेले शब्द वाचण्यात ९९% लोकं ठरले अपयशी; तुम्ही शोधू शकता का?
photo(sourse: Reddit)

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक फोटो खूप चर्चेत आहे. चित्रात काहीतरी लिहिलेले आहे, ज्यात इंग्रजीत दोन शब्द आहेत. हे इंग्रजी शब्द ओळखण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहे. मात्र, असा दावा केला जात आहे की ९९ टक्के लोक हा शब्द वाचण्यात अपयशी ठरले आहेत. चला तर मग बघूया तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत?

राइटिंग इल्यूजन चित्र येथे आहे

जवळपास ९९% लोक हे शब्द शोधण्यास अयशस्वी ठरले आहेत. मात्र, तुमची नजर जर तीक्ष्ण असेल तर तुम्ही हे शब्द सहज शोधू शकता. जर तुम्हालाही चित्रात लपलेले शब्द शोधताना त्रास होत असेल तर आम्ही तुमचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करू. हा शब्द समजण्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे ९० टक्के बंद ठेवावे लागतील. तुम्ही हे करताच, तुम्ही ऑप्टिकल भ्रमाच्या पकडीतून बाहेर पडाल आणि तुम्हाला तो शब्द दिसेल.

(हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेला प्रसिद्ध सेलिब्रिटीचा चेहरा तुम्ही ओळखू शकता का? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचे उत्तर)

‘हे’ आहेत दोन शब्द

मात्र, तरीही तुम्हाला शब्द वाचता येत नसतील तर आम्ही तुम्हाला सांगतो की या चित्रात BAD EYES हे ब्लॉक्स आणि स्टीक्समधून लिहिलेले शब्द आहेत. पण कलाकाराने ते उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य अशा पद्धतीने डिझाइन केले आहे. तसंच, काही वापरकर्त्यांचा असा देखील दावा आहे की त्यांना डोळे बंद न करता शब्द समजला आहे. काही लोक असेही म्हणतात की जर तुम्ही तुमचा फोन काही अंतरावर ठेवलात तर तुम्हालाही शब्द दिसतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
फोटो गॅलरी