Viral Video : सोशल मीडियावर अनेक चकीत करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका चिमुकल्याचा हा व्हिडीओ असून या चिमुकला खूप शिस्तप्रिय पद्धतीने पोहताना दिसत आहे. चिमुकल्याला पोहताना पाहून तुम्हीही क्षणभरासाठी अवाक् व्हाल.

पोहण हा अत्यंत लोकप्रिय व्यायामाचा प्रकार आहे. पोहण्याची कला अनेकांना अवगत असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जणांना पोहायला आवडते.सोशल मीडियावरही पोहताना अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण या चिमुकल्याची पोहण्याची कला थक्क करणारी आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दिड किंवा दोन वर्षांचा चिमुकला (अंदाजे वय) स्विमिंग पूल शेजारी उभा आहे. व्हिडीओ पाहताना सुरुवातीला तो पाण्यात पडेल का अशी भीती आपल्याला वाटते पण नंतर हा चिमुकला ज्या पद्धतीने पोहतो, ते पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : आयुष्य हे खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे; वृद्ध व्यक्तीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

gulshan.khurana.7370 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “हा चिमुकला खरंच डाउनलोड करुन आणला आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच हा वयाने लहान आहे की याची उंची कमी आहे?” काही युजर्सनी या चिमुकल्याचे कौतुक केले आहेत.