आजारी रुग्णांची योग्य ती काळजी डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात घेण्यात येते. पण, रुग्णालयातसुद्धा रुग्णाची योग्य काळजी घेतली गेली नाही की, सामान्य माणसांचा संताप होतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या मुरादाबाद जिल्हामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरादाबादच्या एका सरकारी रुग्णालयातील या घटनेचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रस्त्यावरील एक कुत्रा रुग्णालयामध्ये घुसून रुग्णासाठी ठेवलेलं अन्न खाताना दिसून आला आहे आणि सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल व्हिडीओ रुग्णालयाचा आहे. हे मुरादाबादचे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयात एक रुग्ण बेडवर झोपला आहे. रुग्ण झोपला आहे आणि त्या बेडच्या बाजूला असलेल्या टेबलावर रुग्णासाठी जेवण ठेवण्यात आलं आहे. तर प्रकरण असं आहे की, रस्त्यावरील कुत्रा मुरादाबादच्या या सरकारी रुग्णालयात घुसून रुग्णासाठी ठेवलेलं अन्न खाताना दिसतो आहे. सरकारी रुग्णालयाचा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा…महिला रिक्षाचालकाची दादागिरी, वाहतूक पोलिसाला केली चपलेने मारहाण; VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

पोस्ट नक्की बघा :

रुग्णाचे अन्न खाणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल :

कुत्र्याला असे रुग्णालयात पाहून उत्तर प्रदेशच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच रुग्णालयात कुत्रा आलाच कसा? हीसुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यनंतर सीएमओ (CMO) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीएमओ यांच्याकडून रुग्णालयात कुत्रे येऊ नयेत यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे, असे आता सांगण्यात आले आहे. रुग्णालयातच उपस्थित असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @imayankindian एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. एक रुग्ण बेडवर झोपला आहे आणि रस्त्यावरील एक कुत्रा त्या रुग्णासाठी ठेवलेलं जेवण खाताना दिसतो आहे’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे