साप हा पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वात प्राणघातक आणि भयानक सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. साप कधी कुठे आढळेल हे सांगता येत नाही. शिवाय सोशल मीडियावर तर सापांशी संबंधित अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ते कधी कारच्या बोनेटमध्ये, कधी बाईकच्या चाकांमध्ये तर कधी चक्क शूजमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं. कधी कधी हे साप प्राणघातक देखील ठरु शकतात. सध्या सापाशी संबंधित असताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा ऑस्ट्रेलियातील असून येथील एका एका बार मॅनेजरच्या डेस्क ड्रॉवरमध्ये एक अजगर आढळून आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सनशाइन कोस्ट स्नेक कैचर्स 24/7 ने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. कंपनीने ड्रॉवरमध्ये शांतपणे झोपलेल्या काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या सापाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बार मॅनेजरच्या डेस्क ड्रॉवरमध्ये साप. एका स्थानिक ठिकाणचा व्यवस्थापक दिवसभर त्याच्या डेस्कवर काम करत होता आणि जेव्हा तो काम संपवून जात होता तेव्हा त्याने ड्रॉवर उघडला असता त्याला साप दिसला, सापाला पाहताच त्याला धक्का बसला!”

हेही पाहा- बाईकवर बसायला जागा नाही म्हणून महिलेने केलं जबरदस्त जुगाड; व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

दरम्यान, या सापाला पकडतानाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये साप पकडणारे लोक काही उपकरणे घेऊन घटनास्थळी पोहोचल्याचं दिसत आहे. त्यांनी ड्रॉवर उघडला आणि कोपऱ्यात बसलेला अजगर पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर साप पकडणाऱ्यांनी ते अजगर पिशवीत टाकून जंगलात नेऊन सोडलं आहे. अजगराला पकडल्याच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकांच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंटदेखील येत आहेत.

हेही पाहा- तुमच्या २ हजाराच्या नोटा वारल्या…; RBI च्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; Viral मीम्स पाहून पोट धरुन हसाल

एका वापरकर्त्याने म्हटलें आहे, “मला सर्वात विचित्र जागी साप आढळला होता, तो माझ्या एका शूजमध्ये होता! तो अजगर खूप मस्त होता.” तर दुसऱ्याने, “आता साप काम करायला जात आहेत! सुंदर!!” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर आणखी एका व्यक्तीने “मी जातो आणि माझ्या डेस्कच्या ड्रॉवरला कुलूप लावतो. तुम्ही मला खरोखर घाबरवले आहे.” अशा अनेक कमेंट नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A python was hiding in the bar managers desk drawer the thrilling video went viral on social media jap