Viral Video: वडापाव हा मुंबईकरांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मुंबई असो की पुणे राज्यातील विविध भागात त्यांचा असा एक प्रसिद्ध वडापाव हा असतोच. तुम्हीही कोणत्याही ठिकाणी फिरायला जा तेथील प्रसिद्ध वडापाव खाल्ल्याशिवाय कोणालाही रहावत नाही तितकचं खरं आहे. तर आज सोशल मीडियावर वडापाव संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये गोव्याच्या एका प्रसिद्ध आणि जुन्या वडापाव विक्रेत्याबद्दल सांगण्यात आलं आहे. येथे एका व्लॉगरने गोव्यात पहिल्यांदा वडापाव चाखला आहे.

व्हायरल व्हिडीओ गोव्यातील आहे. युक्रेनियन व्लॉगर स्वितलाना हेन्को सध्या गोवा फिरायला गेली आहे. तिने प्रथमच स्थानिक दुकानात वडा पाव खाल्ला. या वडापावची किंमत २० रुपये होती. तसेच वडापाव विक्रेत्याचे नाव रुपेश आहे आणि हे दुकान ते जवळजवळ ४० ते ५० वर्षांपासून चालवत आहेत. त्यांचे दुकान गोव्यात खूप प्रसिद्ध आहे. वडापाव खात हा संवाद व्लॉगरने विक्रेत्याशी साधला आहे. वडापाव खाल्ल्यानंतर व्लॉगरने काय प्रतिक्रिया दिली एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…सुरक्षा महत्त्वाची की…? ATM मधील एसीच्या थंडगार हवेत झोपले अन्… तीन अज्ञात पुरुषांचा ‘हा’ VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्लॉगर वडापाव खाल्ल्यानंतर खूप चवदार आहे आणि बाहेरून मऊ आहे ; असे वर्णन करताना दिसते आणि आज वडापाव खाल्ल्यानंतर मला कळले की, ‘तो भारतात इतका प्रसिद्ध का आहे’. तसेच एक अज्ञात ग्राहक तेथे उभा असतो त्याला सुद्धा व्लॉगर या वडापाव बद्दल विचारताना दिसते. तेव्हा अज्ञात व्यक्ती सुद्धा वडापावचे कौतुक करते आणि व्लॉगरच्या सुद्धा वडापावचे पैसे भरते. त्यावर तुम्ही नका पैसे भरू असे व्लॉगर सांगते. त्यावर ‘तू युक्रेनची आहेस ना? आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो’ असे त्या अज्ञात ग्राहक व्लॉगरला म्हणायला दिसत आहे हे ऐकून व्लॉगर त्याला थँक यू! म्हणते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @svitlanahaienko’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी वडापाव विक्रेत्याची प्रशंसा करीत आहेत. तर व्लॉगरला भारतीय पदार्थ आवडत आहेत हे पाहून तिचे कौतुक देखील करत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि व्लॉगरच्या या व्हिडीओची विविध शब्दांत प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.