विविध कार्यक्रमात डान्स, गाणं यांची जुगलबंदी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण, एक व्यक्ती खेळण्यातील वस्तूंबरोबर जुगलबंदी करताना दिसली आहे, असे आम्ही जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का ? नाही; तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण बासरी वाजवतो आहे आणि एक खेळणं तरुणाची जुगलबंदी करण्यात साथ देतो आहे.

डान्सिंग आणि टॉकिंग कॅक्टस टॉय (Dancing and Talking Cacutus toy ) हे खेळणं अधिकच लोकप्रिय आहे. हे खेळणं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मनोरंजन करते. या खेळण्यामध्ये अनेक गाणी आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, या खेळण्यासमोर तुम्ही एखादा आवाज काढून दाखवला, एखादं वाक्य किंवा गाणं म्हटलं तर हे खेळणंसुद्धा त्याच्या स्टाईलमध्ये ते वाक्य हुबेहूब तुम्हाला बोलून दाखवेल.

हेही वाचा… संस्कार असावे तर धोनीसारखे! स्वत:आजीजवळ जाऊन बसला धोनी अन् फोटो काढला, माणूसकीचे दर्शन घडवणारा VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

टॉकिंग टॉयसह जुगलबंदी :

तर व्हायरल व्हिडीओत डान्सिंग कॅक्टस हे खेळणं आणि तरुणाची जुगलबंदी सुरू आहे. तरुण बासरी वाजवायला सुरुवात करतो. तरुण बासरीच्या सहाय्याने एक धून वाजवतो आहे, तर व्हिडीओतील मजेशीर गोष्ट अशी की, व्यक्ती जसं बासरीवर धून वाजवते आहे, अगदी त्याचप्रमाणे हे खेळणंसुद्धा त्यांच्या पद्धतीत ही धून वाजवताना दिसते आहे. या खेळण्यातील मधूर आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. तरुण आणि खेळणं यात रंगलेली ही अनोखी जुगलबंदी एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…

तरुण जसे बासरी वाजवायला सुरुवात करतो, तसेच हे खेळणंसुद्धा तरुणाबरोबर जुगलबंदी करायला सुरुवात करतो. तरुण देखील हे पाहून हसायला लागतो आणि व्हिडीओचा शेवट होतो. खेळण्याने हुबेहूब बासरीची धून वाजवलेली पाहून हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @musicalunpluggeds आणि @divaynashshirvastav या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दिव्यांश असे या युजरचे नाव आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून या अनोख्या जुगलबंदीची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. हा व्हिडीओ पसंतीस उतरल्यानंतर त्याने आणखीन काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत; जे या डान्सिंग आणि टॉकिंग कॅक्टस खेळण्याबरोबर जुगलबंदी करतानाचे आहेत.