a video in Punjabs Amritsar has gone viral when a drunk rickshaw driver rammed the oncoming vehicle | Loksatta

Video: दारुच्या नशेत रिक्षाचालकाने समोर येईल त्या वाहनाला दिली धडक, पोलिसांसमोर घडली धक्कादायक घटना

व्हिडीओत एक पोलिस बाईकवरुन ई-रिक्षाचा पाठलाग करताना दिसत आहे

E rickshaw and police viral video
पंजाबमधील अमृतसर येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

पंजाबमधील अमृतसर शहरातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिसांच्या समोरुन एक रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत ई-रिक्षा पळवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून हा रिक्षाचालक रस्त्यात एका बाईकस्वाराला धडक देतो आणि तसाच रिक्षा भरधाव वेगाने घेऊन जाताना पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत पोलिस एका बाईकवरुन ई-रिक्षाचा पाठलाग करताना दिसत आहेत. पोलिस कर्मचारी रिक्षाचालकाला वारंवार थांबण्यास सांगत आहे. तर ई-रिक्षाचालकही पोलिसांना काहीतरी सांगताना दिसत आहे. पण तो काही केल्या रिक्षाचा वेग कमी करत नाही. याचदरम्यान रिक्षाचालक एका गल्लीत दुचाकीस्वाराला धडक देतो आणि रिक्षा न थांबवता भरधाव वेगाने निघून जातो. व्हिडीओच्या शेवटी रिक्षा एका गल्लीत घुसल्याचं दिसत आहे. गल्लीतील रस्ता अरुंद असल्यामुळे रिक्षा चालकाला रिक्षा चालवणं अवघड जातं आणि तो धावत्या रिक्षातून उडी मारुन पळून गेल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- …अन् आजोबांनी चक्क शेळ्यांनाच गाडीला जुंपलं, देशी जुगाडाचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @Raajeev_Chopra नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून व्हिडीओतील रिक्षाचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणीही ते करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

हेही पाहा- भररस्त्यात बेभान नाचत होतं जोडपं; सरकारने १० वर्षांची शिक्षा सुनावली, पाहा Video

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओतील रिक्षाचालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. तर या धक्कादायक घटनेला अमृतसरच्या लॉरेन्स चौकातून सुरुवात झाली. ज्यावेळी रिक्षाचालक एका वृद्ध जोडप्याला ग्रीन अव्हेन्यूला या ठिकाणी घेऊन जाणार होता, पण तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याने या जोडप्याला दुसऱ्याच रस्त्याने घेऊन निघाला होता.

रिक्षात बसलेल्या जोडप्याला ड्रायव्हर रिक्षा चालवण्यासाठी शुद्धीत नसल्याचं समजताच त्यांनी या रिक्षाचालकाबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तेथून पळून गेला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 12:08 IST
Next Story
दैव बलवत्तर म्हणून वाचले महिलेचे प्राण; एक पाऊल पुढे टाकले असते तर… Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल