सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनेक वेगवेगळे व्हिडीओ आपणाला पाहायला मिळत आहेत. कधी नवरा-नवरीच आपल्या लग्नात बेभानपणे नाचल्याचे तर कधी नवरदेवाच्या मित्रांनी मुलींनाही लाजवेल असे फेमिनिन गाण्यांवर डान्स केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच आता दोन वयस्कर मित्रांनी स्टेजवर केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लग्न समारंभाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच मुलाच्या लग्नात वडिलांनी केलेला डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता दोन वयस्कर मित्रांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या गाण्यावर केलेल्या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

हेही पाहा- वॉश बेसिनमध्ये बसून भांडी धुणाऱ्या वानराचा Video व्हायरल; पुरुषांना होतेय लॉकडाऊनची आठवण

हा व्हिडीओ sangeet_with_salvi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन वयस्कर मित्र त्यांच्या आवडत्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमधील दोन्ही व्यक्ती सूट-बूट आणि काळा चष्मा घालून नाचताना दिसत आहेत.

हेही पाहा- Video: ‘मार डाला’ गाण्यावर तीन मित्रांनी केलेला डान्स पाहून मुलींनी वाजवल्या टाळ्या पण नवरदेवाला हसू आवरेना

नेटकऱ्यांना पडली भुरळ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या सिनिमातील आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांच्या डान्सने अमिताभ बच्चन आणि गोविंदालाही टक्कर दिली असल्याचं म्हटलं आहे. आतपर्यंत हा व्हिडिओ १ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हा डान्स पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका मुलीला हा व्हिडीओ खूप आवडला असून तिने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ‘वय हे फक्त नंबर असतात, यार…’ तर आणखी एका मुलीने हे दश्य खूपच सुंदर असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of two elderly friends dancing to the song bade miya chote miya is going viral on social media jap