Which Number Is Linked To Your Aadhaar Card : शाळेत प्रवेश घेताना, नोकरीवर रुजू होताना, तसेच बँकेच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. पण, तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे की नाही ते अनेकदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पाठवला जाणारे OTPs निष्क्रिय (inactive) नंबरवर पाठवले जातात. अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डावर असणारा मोबाईल नंबर अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे (Aadhaar Card Update) . पण, हे नेमकं कसं करायचं हे अनेकांना माहीत नसतं. तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपा मार्ग घेऊन आलो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update ) हा कीवर्ड गूगल ट्रेंडवर मोठ्या प्रमाणात कालपासून सर्च केला जात आहे. आधार कार्ड अपडेट फॉर्म (Aadhaar Card Update Form), आधार कार्ड अपडेट नीयर मी (Aadhaar Card Update Near Me), यूआयडीएआय (UIDAI ), आधार कार्ड अपडेट चेक (Aadhaar Card Update Check) आदी अनेक प्रश्न गूगलवर सर्च केले जात आहेत. तर आज याच पार्श्वभूमीवर आज आपण आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.

हेही वाचा…Airtel Affordable Plan : आता सतत रिचार्ज करण्याची गरज नाही, Airtel ने आणलाय धमाकेदार प्लॅन; भरपूर डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन मिळेल फ्री

आधार कार्डावरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी कसा कराल अर्ज? (Update Your Aadhaar Card Number):

UIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in/ वेबसाईटवर जा.

होमपेजवर, ‘Get Aadhaar’वर क्लिक करा आणि ‘Book Appointment’ निवडा.

पुढील पेजवर तुमच्या शहराचे नाव लिहा किंवा आपले शहर सूचीबद्ध नसल्यास ‘इतर’ हा पर्याय निवडा. नंतर स्क्रीनवरील सूचनांना फॉलो करा .

तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा (captcha) पूर्ण करा आणि ‘जनरेट ओटीपी’ बटणावर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव, अर्ज पडताळणीचा प्रकार (टाईप ऑफ अप्लिकेशन व्हेरिफिकेशन), शहर आणि आधार सेवा केंद्र निवडावे लागेल.

‘Choose the Service’अंतर्गत, ‘मोबाईल नंबर अपडेट’ हा पर्याय निवडा.

तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट देण्याची तारीख व वेळ निवडा आणि त्यानंतर फॉर्म जमा करण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरण्यास सांगितले जाईल.

एकदा पेमेंट केल्यावर, तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असलेली स्लिप मिळेल. ही स्लिप तुमच्या आधार कार्डावरचा नंबर अद्ययावत झाला आहे का हे ट्रॅक करील.

(फोटो सौजन्य : @Google Trends)

त्याचप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आयडीबीआय बँकेत जाऊन, तुमचा आधार कार्डावरील नंबर ऑफलाईनसुद्धा बदलू शकता. अर्थात, त्यासाठी तुम्हाला शुल्कसुद्धा आकारले जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card update how to change mobile number uidai website offers an easy update process from home search by google trends asp