Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

“बातम्यांमध्ये येतंय की १६ आमदार आहे, व्हॉट्सअपवर येतंय की २९ आमदार गेलेत. नक्की काय भानगड आहे, हे समोर येईल.”

Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”
सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केलं वक्तव्य (प्रातिनिधिक फोटो)

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधातच कथित बंड पुकारल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काही आमदारांसहीत एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती आज सकाळी समोर आल्यापासून राज्यामध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत असून एकनाथ शिंदेंची समजूत घालण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. असं असतानाच बिगबॉस फेम अभिनेता आणि स्वत:ला अपक्ष राजकारणी म्हणून घेणाऱ्या अभिजित बिचुकलेंनी या प्रकरणावर भाष्य करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, असं वक्तव्य केलंय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

“सध्या जे राजकारण सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचं बिलकूल नाहीय, असं बिचकुले एका मंदिरामध्ये देव दर्शनासाठी गेलेले असताना प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हणाले. यावेळी बिचुकले यांना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कथित बंडासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यासंदर्भात बोलताना बिचुकले यांनी, “आता याच्याबद्दल माझं मत असं आहे की, सर्वसामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. लोकांना अन्न मिळणं मुश्कील झालंय. जगणं कठीण झालं आहे,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असल्यासंदर्भात विचारलं असता नारायण राणे हसून म्हणाले, “ते कुठं आहेत असं…”

पुढे बोलताना, “अशा परिस्थितीमध्ये जे राजकारण एकनाथ शिंदे करतायत. माझा शिवसेनेशी संबंध नाही. मी अपक्ष आहे. पण आता जे सुरु आहे त्यावर मी एवढच बोलू इच्छितो की, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असते ना तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता,” असंही बिचुकले म्हणाले. “हे जे मोठे झालेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावरच मोठे झालेले आहेत. यात काही दुमत नाहीय,” असा टोलाही बिचुकलेंनी लागवला.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून दणका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

“यांनी कॉपी कोणाची केली माहितीय? अभिजित बिचुकले जेव्हा वरळीमध्ये येऊन उभा राहतो निवडणुकीला त्याच्या आत्मविश्वासाची कॉपी करायची सवय लागलीय या लोकांना. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हे राजकारण सुरुय असं मला वाटतं,” असंही बिचुकले म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “बातम्यांमध्ये येतंय की १६ आमदार आहे, व्हॉट्सअपवर येतंय की २९ आमदार गेलेत. नक्की काय भानगड आहे, हे समोर येईल. उद्धव ठाकरेंना सदिच्छा आहेत की ते यातून बाहेर पडतील,” असंही त्यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhijeet bichukale says balasaheb thackeray would have slapped eknath shinde scsg

Next Story
मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर तमाशा; पोलीस कर्मचाऱ्याचेही ओढले केस; मुंबईतील घटना सोशल मीडियावर व्हायरल
फोटो गॅलरी