Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर खूप धक्कादायक असतात. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक धक्कादायक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून थरकाप उडतो. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्हाला कळणार नाही की हा अपघात आहे की आत्महत्ता आहे. या व्हायरल व्हिडीओत ट्रक सुरू होताच एक तरुण मध्येच उडी मारताना दिसतो आणि ट्रकच्या चाकाखाली येतो. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रक सिग्ननवर थांबलेला दिसत आहे. ट्रकच्या शेजारी एक तरुण उभा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला वाटेल की हा तरुण रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेला आहे पण पुढे जे काही होते, ते पाहून तुम्हीही डोके धराल. व्हिडीओत पुढे दिसते की सिग्नल सुटल्यावर ट्रक चालक जसा ट्रक सुरू करतो तसा हा तरुण ट्रकच्या मधोमध उडी मारतो आणि ट्रकच्या चाकाखाली येतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही आत्महत्या आहे की अपघात, असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. विशेष म्हणजे या अपघातात ट्रक चालकाची कोणतीही चूक नाही. हा तरुण आत्महत्येच्या उद्गेशाने चालत्या ट्रकमध्ये उडी मारतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल की या तरुणाने असे का केले असावे. ही संपूर्ण घटना ट्रक चालकाच्या मागे उभे असलेल्या कार चालकाने त्याच्या कॅमेरामध्ये कैद केली आहे.
हेही वाचा : Pune Accident : धक्कादायक! सिग्नल तोडला अन् अपघात घडला, छोटीशी चूक पडली महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ
Accident &Fun या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही आत्महत्या होती का? की यासाठी ट्रक चालक जबाबदार आहे का? या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.