अफगाणिस्तान संघाने विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातीलच एका व्हिडीओत अफगाणिस्तानचे खेळाडू लुंगी डान्स गाण्यावर नाचून आपला आनंद साजरा करत आहेत. क्रिकेटर्सची ही धमाल स्टाइल पाहून तुमचाही चेहरा आनंदाने खुलून येईल. यात देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अफगाणिस्तान संघाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले…

यात अफगाणिस्तान संघातील खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विजेता संघ नाचताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आतापर्यंत पाहिलेली #ICCCricketWorldCup23 मधील सर्वोत्तम क्लिप आहे. आता शार्क झालेल्या माशांची ‘मजा.’ चेन्नईत अफगाणिस्तान संघाचा पहिला विजय साजरा करताना खेळाडू ‘लुंगी डान्स’ करताना दिसत आहेत.

चाहते आणि खेळाडूंनी सोमवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी सामन्यातील विजयाचा आनंद साजरा केला. त्याचवेळी २५ ऑक्टोबर रोजी विजेता अफगाण संघाचा बसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रशीद खान, नूर अहमद आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्यासह अनेक खेळाडू चालत्या बसमध्ये त्यांच्या सीटच्यामधील लॉबीमध्ये नाचत आहेत. हे खेळाडू शाहरुख खानच्या ‘लुंगी डान्स, लुंगी डान्स’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जणू काही वर्ल्ड कप जिंकल्यासारखा आनंद दिसत आहे.

मस्त माहोल, युजर्सच्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप व्ह्यूज मिळत आहेत. त्याचबरोबर यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले – अफगाणिस्तान संघाने विजय इतका साजरा केला, जितका त्यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही इतका आनंद साजरा केला नसता. मस्त माहोल आहे, संघ भारी आहे, छान आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan team fun group dance video beating pakistan in icc world cup 2023 anand mahindra share video on twitter sjr