Richest Female YouTubers In India: प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये अश्लिल विधान केल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याच कार्यक्रमात अपूर्वा मुखिजा या युट्यूबर तरुणीनेही अश्लिल विधान केले होते. रणवीरप्रमाणेच अपूर्वा मुखिजाचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा प्रसार मोबाइलवर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे व्हिडीओ मजकूर जास्तीत जास्त पाहिला जाऊ लागला. युट्यूब हे माध्यम अशा व्हिडीओ निर्मात्यांना खुणावू लागले. त्यातूनच हजारो व्हिडीओ क्रिएटर पुढे आले. रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी, भुवन बाम, कॅरीमिन्नाटी आणि संदीप महेश्वरी ही त्यापैकीच काही उदाहरणे आहेत. यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींमध्ये आहे. व्लॉगर्स, गेमर्स, कॉमेडियन्स आणि शैक्षणिक मार्गदर्शन करणारे शेकडो व्हिडीओ निर्माते आता पुढे आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ कंटेट क्रिएटर युट्यूब आणि इतर माध्यमांतून लाखो रुपये कमावत असतात. व्हिडीओच्या माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी विविध ब्रँडच्या जाहिरातीसाठी वापरली जाते. यातूनही आणखी पैसा मिळतो. अपूर्वा मुखिजा ही तरुणीही करोना काळात व्हिडीओ क्रिएटर म्हणून पुढे आली होती. तिच्याप्रमाणेच युट्यूबवरून पैसे कमविणाऱ्या काही तरुणींची माहिती घेऊ.

श्रुती अर्जुन आनंद – १०.२ दशलक्ष सबस्क्राइबर

श्रुतीने २०१० साली लाईफस्टाइल संदर्भात व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. ब्युटी टीप्स, मेक-अप हॅक्स आणि स्किनकेअर बद्दल माहिती देणारे व्हिडीओ श्रुतीकडून तयार करण्यात येतात. हळूहळू तिच्या व्हिडीओमध्ये कलात्मकता येऊ लागली. सध्या ती कौटुंबिक प्रकाराचेही व्हिडीओ तयार करते. तिच्याकडे ४५ कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.

निशा मधुलिका – १४.७ दशलक्ष सबस्क्राइबर

निशा मधुलिका यांचे युट्यूब चॅनेल खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले आहे. २०११ साली त्यांनी चॅनेलची सुरुवात केली होती. विविध पद्धतीने शाकाहारी पदार्थ बनविणे त्यांना आवडते. पदार्थ बनविताना सोप्या भाषेत त्याची पद्धत सांगण्याची त्यांची हातोटी असल्यामुळे निशा मधुलिका यांना मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. मधुलिका यांची एकूण संपत्ती ४३ कोटी असल्याचे सांगितले जाते.

प्राजक्ता कोळी – ७.२१ दशलक्ष सबस्क्राइबर

प्राजक्ता कोळीच्या गर्ल नेक्स्ट डोअर शैलीच्या व्हिडीओंना तरुणाईमध्ये चांगली पसंती आहे. सुरुवातीला विनोदी शैलीचे व्हिडीओ करून प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्राजक्ता चित्रपट, वेबसीरीजमध्येही अभिनय करू लागली. जुग जुग जियो, नियत आणि मिसमॅच्ड अशा मालिकांमधून तिने काम केले आहे. तिचे वार्षिक उत्पन्न १६ कोटी असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After apoorva makhija raw discussion richest female youtubers in india in know who is shruti arjun anand komal pandey kvg