Jupiter and Shani Visible From Earth: आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह ‘गुरू’ पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे. गुरु ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास १२ वर्षे लागतात आणि यावेळेस तब्बल १६६ वर्षांनी गुरु ग्रह पुर्थ्वीच्या इतक्या जवळ येणार आहे. जेव्हा एकाच वेळी सूर्य पश्चिमेला अस्त होतो आणि अन्य ग्रहाचा उदय पूर्वेकडे होतो तेव्हा सूर्य आणि तो ग्रह एकमेकांच्या अगदी समोरासमोर येतात. यावेळेस जेव्हा गुरु ग्रहाच्याबाबत ही खगोलीय घटना घडेल तेव्हा गुरुचे दर्शन पृथ्वीवरून सर्वात महाकाय व स्पष्ट दिसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक पृथ्वी व गुरु समोरासमोर येण्याची घटना दर १३ महिन्यांनी घडत असते. मात्रा नासा (NASA) च्या माहितीनुसार, येत्या २६ सप्टेंबरला केवळ गुरू ग्रहाचीच नव्हे तर पृथ्वीचीही प्रदक्षिणा इतक्या जवळून होत आहे गुरूचा आकार सूर्याहूनही मोठा दिसू शकतो.तब्बल १६६ वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गुरु ग्रह २६ सप्टेंबर पासून एक आठवडाभर दृश्यमान असेल. दुर्बिणीच्या साहाय्याने आपणही त्याचे निरीक्षण करू शकाल. हवामानही उत्तम असल्यास म्हणजेच ढग नसल्यास सूर्यापासूनचा पाचवा ग्रह अगदी स्पष्टपणे पाहता येईल.

गुरू ग्रह २६ सप्टेंबरला कुठे व कसा पाहता येईल?

गुरू ग्रहाला पाहण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विशिष्ट, खास मोठ्या दुर्बिणीची गरज नाही. सामान्य दुर्बिणीच्या माध्यमातूनही तुम्ही सहज गुरू ग्रह पाहू शकाल. नासाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू ग्रहावरील तपशील पाहण्यासाठी ४ इंच किंवा त्यापेक्षा मोठी दुर्बिण आवश्यक आहे.

गुरू ग्रहासह ‘हा’ ही आहे योग..

गुरू ग्रहाच्या अगदी वर पाहताच तुम्हाला एका मोठ्या नक्षत्रात “ग्रेट स्क्वेअर ऑफ पेगासस” म्हणून ओळखले जाणारे चार तेजस्वी तार्‍यांचे डायमंड-आकाराचे नक्षत्र देखील दिसेल. इथूनच उजवीकडे दूर पाहताच तुम्हाला शनि दिसेल.

दरम्यान, गुरु ग्रह कमीत कमी पुढच्या काही आठवड्यांपर्यंत तेजस्वी आणि सुंदर असेल. यानंतर थेट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी असा योग जुळून येणार असल्याचे नासाने सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After in 166 years jupiter will be so close to earth shani can be also seen where and how to watch svs