Airtel Prepaid Mobile Recharge Plans : सध्या रिचार्ज प्लॅनशिवाय मोबाईलमध्ये कोणतीच गोष्ट करणे शक्य नाही आहे. पण, दिवसेंदिवस वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या किमती पाहता, नक्की रिचार्ज किती रुपयांचा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त खर्च न करता, तुमचे सिम ॲक्टिव्ह ठेवायचे असेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
टेलिकॉम कंपनी एअरटेल सध्या ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे चार प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते आहे. त्यामध्ये १९९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये व २९९ रुपये अशा रिचार्ज प्लॅनचा समावेश आह. हे चार रिचार्ज प्लॅन्स बजेट फ्रेंडली युजर्ससाठी आहेत. पण, या कोणत्याही प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा किंवा 5G नेटवर्कचा समावेश नाही.
त्यातील सर्वांत परवडणारा प्लॅन म्हणजे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन, ज्याची किंमत वाढली आहे. सुरुवातीला या रिचार्ज प्लॅनची किंमत १७९ रुपये होती आणि त्यापूर्वी हा रिचार्ज प्लॅन १५५ रुपये होता. त्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा, एसएमएसचे फायदे दिले जातात.
चला तर आता प्रत्येक प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊ (Airtel Prepaid Mobile Recharge Plans List) :
१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel 199 Rupees Recharge Plan)
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी वैधता. एकूण २ जीबी डेटा, १०० एसएमएस व अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स दिले जातील.
२१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel 219 Rupees Recharge Plan)
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी वैधता. एकूण ३ जीबी डेटा, ३०० एसएमएस व अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स दिले जातील.
२४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel 249 Rupees Recharge Plan)
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला २४ दिवसांसाठी वैधता. एकूण १ जीबी डेटा, १०० एसएमएस व अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स दिले जातील.
२९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel 299 Rupees Recharge Plan)
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी वैधता. एकूण १ जीबी डेटा, १०० एसएमएस व अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स दिले जातील.
यापैकी कोणत्याही पॅकमध्ये ओटीटीचे फायदे देण्यात आलेले नाहीत. पण, जर तुम्ही थोडा जास्त खर्च करण्यास तयार असाल, तर ३०१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Airtel 301 Rupees Recharge Plan) व्हॉइस, एसएमएस व डेटा आणि डिस्ने+ हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. तसेच हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असून, एकूण १ जीबी डेटा, १०० एसएमएस व अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स दिले जातील.