मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रुग्णवाहिकेमध्ये दारू पार्टी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण रुग्णवाहिकेच्या मागच्या सीटवर मागे बसून बिअर पिताना दिसत आहेत. रुग्णवाहिकेमधल्या या घटनेचा व्हिडीओ पाठून जात असलेल्या एक दुचाकीस्वाराने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या रुग्णवाहिकेमध्ये बिअर पिण्याचा हा व्हिडीओ भोपाळमधील हलालपूर बसस्थानकाच्या लालघाटी येथील आहे. बिअर पीत असलेले लोक कोण आहेत आणि हा व्हिडीओ कधीचा आहे, हे कळू शकलेले नाही. मात्र रुग्णवाहिकेमध्ये दारू पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

चालत्या रुग्णवाहिकेमध्ये बिअर पित असल्याची भोपाळ पोलिसांनी दखल घेतली आहे. भोपाळचे अतिरिक्त सीपी सचिन अतुलकर म्हणाले की, रुग्णवाहिका संलग्न असलेल्या रुग्णालयाच्या ऑपरेटरशी संपर्क केला जाईल. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, त्यानंतर हे लोक कोण आहेत, कोण बीअर पीत आहेत हे शोधून या संपूर्ण प्रकरणावर कारवाई केली जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol party in moving ambulance video of people drinking beer goes viral ttg