जगातील कोणत्याही तंत्रज्ञानाच्या तुलनेत भारतीयांची जुगाड पद्धत सर्वात बेस्ट असते असं म्हणतात. सोशल मीडियावर दररोज असे काही व्हिडीओ शेअर केले जातात ज्यात हे जुगाड तंत्र पाहायला मिळते. हा व्हायरल व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करत आहे आणि काम सोपे करण्यासाठी काय केलं जाऊ शकत याची कल्पना देतो. असाच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स प्रचंड हसत आहेत.

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

इन्स्टाग्रामवर शेअर करा या व्हिडीओमध्ये बांधकाम साइटवर काम करणाऱ्या दोन मजुरांनी अशा प्रकारे जुगाड केला आहे की वापरकर्ते हसायला लागले आणि असंख्य कमेंट करू लागले. प्रत्यक्षात या व्हिडीओमध्ये मजूर घराचं बांधकाम करत आहेत. दोन मजूर सिमेंट किंवा वाळूने भरलेली पिशवी दोरीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्यावर पाठवताना दिसत आहे. जुगाडाचा वापर करत ती बॅग वर काम करणाऱ्या तिसऱ्या मजुरापर्यंत पोहोचली.

What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

(हे ही वाचा: “भारतात परत येईल तर माझ्या कुत्र्यासोबतच…” युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स हसले आणि मजेशीर कमेंट्स केल्या. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे तंत्र बाहेर जाऊ नये.’ या व्हिडीओला इंस्टाग्रामवर ५६ हजारांहून अधिक लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याआधीही इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

अनेक वेळा प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही अशा प्रकारचे व्हिडीओ लाईक करतात. उद्योगपती आनंद महिंद्रा या बाबतीत बरेचदा पुढे असतात.