Anand Mahindra Viral Post : भारताने आशिया पॉवर इंडेक्समध्ये मोठे स्थान प्राप्त केले आहे. जपानला मागे टाकून भारत आशियातील तिसरा शक्तिशाली देश बनला आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, भारताची वेगवान आर्थिक प्रगती, तरुणांची प्रचंड लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विस्तार, यामुळे भारत या उच्च स्थानापर्यंत पोहोचला आहे. हे यश केवळ भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचेच प्रतिबिंब नाही तर जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या विश्वासार्हतेचा दाखला आहे. दरम्यान, भारताच्या याच यशावर आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स (@stats_feed) ने एक्सवर जगातील सर्वात १० शक्तिशाली देशांची यादी शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टिट्यूटच्या २०२४ एशिया पॉवर इंडेक्सद्वारे ही यादी तयार करण्यात आली आहे. यात आशियातील २७ देशांचे विविध पॅरामीटर्सच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले आहे, ज्यात सर्व देशांमधील आर्थिक स्थिती आणि लष्करी क्षमता, भविष्यातील संसाधने, आर्थिक भागीदारी, संरक्षण नेटवर्क, राजनैतिक प्रभाव आणि सांस्कृतिक प्रभावाच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या यादीनुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

भारताचा नंबर कितवा?

या यादीनुसार भारत जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश आहे. भारताच्या वर अमेरिका आणि चीन आहेत; त्यानंतर जपान, रशिया, ब्रिटन, जर्मनी, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया आहेत. या यादीवर आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, “शक्ती देश बनवण्याबरोबर आता जबाबदारीदेखील तितक्याच जास्त असणार आहेत.”

आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट काही तासांतच दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिली, तर मोठ्या संख्येने लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “रशियाचा क्रमांक भारत आणि जपानच्या वर असावा असे मला वाटते.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भारत टॉप ३ मध्ये पोहोचणे हा त्याच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा पुरावा आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “येत्या दहा वर्षांत चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो.” आणखी एकाने लिहिले की, “काही वर्षांत या यादीत मोठे बदल दिसून येतील.” अजून एकाने लिहिले की, भारत टॉप ३ मध्ये आहे याचा खूप अभिमान आहे, आपण चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकू. शेवटी एका युजरने म्हटले की, “चीनकडे भरपूर पैसा आहे, परंतु तो देश कधीच जागतिक स्तरावर कोणत्याही युद्धात अडकत नाही, ही एक चांगली रणनीती आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra reaction on world powerful country india number people react post goes viral sjr