उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते सतत नवनवीन सोशल मीडिया ट्रेंड, देशी जुगाड यासारख्या व्हायरल व्हिडीओंची दखल घेत असतात. यासाठी ते आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर करतात. शिवाय एवढ्या व्यग्र व्यापातून ते ट्विटर सक्रिय असल्याचं अनेक नेटकरी कौतुक करतात. आनंद महिंद्रा हे त्यांच्या मंडे मोटिव्हेशनमुळे प्रत्येत सोमवारी चर्चेत असतात. त्यांचे चाहते तर मंडे मोटिव्हेशनची वाटच बघत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही पाहा- गोंडस मांजरीचे केस कापतानाचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, ‘एवढे शांत तर…’

मात्र, यावेळी महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडियावर रविवारी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी रविवारी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याबद्दलचा मेसेज देिला आहे. लोकांना रविवारचे महत्त्व सांगण्याचा संदेश देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी एका पाणमांजराचा (Otter) व्हिडिओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन गोंडस पाणमांजर एकमेकांचा हात धरून पाण्यात पोहताना दिसत आहेत. उत्तर अमेरिकेतील हवामानानुसार, पाणमांजर एकमेकांचे हात धरून झोपतात. ही पाणमांजर जेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर झोपतात तेव्हा ते एकमेकांचा हात धरतात जेणेकरून ते पाण्याच्या प्रवाहापासून वेगळे होणार नाहीत. या व्हिडिओचे उदाहरण देत आनंद महिंद्रा यांनी आपणही आपल्या कुटुंबीयांबरोबर एकत्र राहण्याचा संदेश देत आहेत.

त्यांनी रिट्विट केलेला हा व्हिडीओ @wonderofscience नावाच्या अकाऊंटवरील आहे. हे ट्विट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, रविवार हा कुटुंबासाठी आहे, कुटुंब म्हणजे एकमेकांना जोडणे आणि सुरक्षित ठेवणे यासाठी ‘राफ्टिंग’ हा योग्य शब्द आहे. आता कोणी मला विचारले की ‘तुम्ही सुट्टीच्या दिवशी काय केले?’ तर माझे उत्तर असेल, मी राफ्टिंग करत होतो. असं लिहित महिंद्रा यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा संदेश दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra shared a video about the importance of spending time with family jap