Viral Video: पावसाळा म्हंटल की, लगभग सुरु होते ती छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल घेण्याची… अनेकदा पावसाळ्यात छत्री पकडावी की बॅग यामध्ये अनेकांची तारांबळ उडते. कारण एका हातात छत्री तर दुसऱ्या हातात सामान किंवा बॅग पकडणे जड तर जातेच. तसेच बॅगेतील सामान व पावसाच्या पाण्यामुळे कपडे भिजण्याची सुद्धा भीती मनात असते. तर या समस्येवर आज एका तरुणाने जुगाड शोधून काढला आहे. हा जुगाड आनंद महिंद्रा यांना सुद्धा प्रचंड आवडला आणि त्यांनी खास मेसेजसह सोशल मीडियावर मुंबईकरांसाठी शेअर केला आहे.

एका तरुणाने पावसापासून स्वतःचे आणि सामानाचे संरक्षण व्हावे म्हणून एक जबरदस्त मार्ग शोधून काढला आहे. तरुणाने त्यांच्या छत्रीमध्ये थोडा बदल केला आहे. छत्रीला हँड्स-फ्री करण्यासाठी त्याला एक कल्पना सुचली. त्याने छत्रीच्या हँडलला दोन हँगर जोडले आहेत. हे हँगर त्याने एखाद्या बॅगच्या पट्ट्याप्रमाणे मॉडिफाय केले आहेत. जेणेकरून छत्री पाठीवर बॅगप्रमाणे घातली जाऊ शकते. या जुगाडामुळे त्याचे हात सामान पकडण्यासाठी मोकळे राहतील आणि पावसाच्या पाण्यापासून त्याच्या कपड्यांचे संरक्षणही होईल. छत्रीचा जबरदस्त जुगाड व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘फक्त मन मोठं…!’ परदेशातील तरुणांनी ‘मक्याचं कणीस’ खाण्याचा लुटला आनंद; VIDEO तील त्यांची ‘ही’ कृती जिंकेल तुमचही मन

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर छत्रीचा हा जुगाड व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, तो सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुद्धा पहिला आणि हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, ‘अखेर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही मुंबईत काहीसा सातत्यपूर्ण पाऊस पाहत आहोत. तरीही पाऊस तितका दिलासादायक पडत नसला तरीही पावसाळ्यात भिजलेल्या ‘कपड्यांचे’ नियोजन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ‘वेअरेबल’ छत्रीबद्दल विचार करणे चांगली कल्पना असू शकते’; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा @anandmahindra यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील हा जुगाड अनेक नेटकऱ्यांना आवडला असून ते विविध शब्दात या कल्पनेचं कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘सर महिंद्रा छत्रीचे उत्पादन सुरू करा आम्हाला तुमच्या कारसारखी टिकाऊ छत्री हवी आहे’ तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, ‘आनंद महिंद्रांसारखे लाईफ हॅकचे व्हिडीओ इतर कोणीही पाहत नसेल’ आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली दिसून आल्या आहेत.