Viral Video: भारतात अनेक सण साजरे करताना किंवा शुभ प्रसंगी दारात आणि अंगणात आवर्जून रांगोळी काढली जाते. सध्या अनेक गुणवंत कलाकार विविध प्रकारच्या रांगोळ्या काढताना दिसून येतात. त्यामध्ये फुलांची रांगोळी, पाण्यातील रांगोळी, ठिपक्यांची, दिव्यांची सजावट केलेली रांगोळी किंवा अनेक कार्टून्स किंवा त्या त्या खास सणाचे वैशिष्ट्य समजून घेऊन रांगोळी काढली जाते. तर, आज सोशल मीडियावर थ्रीडी रांगोळी (3 Dimensions Rangoli) चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या रांगोळी कलेचे अदभुत कौशल्य दाखवते आहे. सुरुवातीला ती घरातल्या पायपुसणीसारखी हुबेहूब रांगोळी काढते. त्यानंतर ती स्वतः रांगोळी काढते आहे, अशीसुद्धा थ्रीडी रांगोळी, तर नंतर खुर्ची या वस्तूचीही हुबेहूब रांगोळी जमिनीवर काढते; जी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.

हेही वाचा…आम्हाला बघूनच हेल्मेट…! मुंबई पोलिसांनासुद्धा ट्रेंडची भुरळ; नागरिकांवरील प्रेम दाखवीत VIDEO केला शेअर

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी घरातील प्रत्येक वस्तूची आणि स्वतःचीही थ्रीडी रांगोळी काढते. अशा प्रकारे वेगवेगळ्या रांगोळ्या काढून ती सर्वाना चकित करते. कारण- या थ्रीडी रांगोळ्या काढण्यासाठी तरुणीने घरातील विविध वस्तूंची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन, त्यांची रांगोळीमध्ये रचना केली आहे. तसेच तुम्हाला थ्रीडी रांगोळी आणि घरातील त्या विशिष्ट वस्तूमध्ये कोणताही फरक दिसून येणार नाही, असे या तरुणीने काढलेल्या रांगोळीचे वैशिष्ट्य आहे.

दिया बैदने, असे या रांगोळी कलाकार तरुणीचे नाव आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @diyasrangoli युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणीच्या या मनमोहक 3D रांगोळ्या पाहून नेटकरी थक्क झाले आहेत आणि तिच्या टॅलेंटचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.